बीड- टाईप च्या परीक्षेत बीड जिल्ह्यात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल 85 विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी केवळ एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून प्रकरण मॅनेज करण्याचा उद्योग सुरू आहे.वास्तविक पाहता परीक्षा केंद्र,केंद्रप्रमुख आणि परीक्षा विभाग यांची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या टाईप च्या परीक्षेत परीक्षा केंद्रात गैरहजर असतानाही 85 विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी होती. हे विद्यार्थी घरीच होते किंवा त्यांच्या जागी दुसऱ्यानेच परीक्षा दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार 20 डिसेंबर 2023 रोजी बीडच्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात घडला आहे. या प्रकरणात एका शिक्षकाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत टंकलेखन परीक्षा घेतल्या जातात. 18 डिसेंबर 2023 पासून ही परीक्षा बीडमध्ये तीन केंद्रांवर घेण्यात येत होती. यामध्ये आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात एक केंद्र होते. येथे केंद्र संचालक म्हणून फैजल हमद चाऊस, तर आयटी टीचर म्हणून पी.एस. नागरगोजे यांची नियुक्ती केली होती. 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1:15 ते 2:45 या दरम्यान एका विद्यार्थ्याने अवघ्या 30 मिनिटांत पाचही सेक्शन (थेरी, ई-मेल, लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज) सोडविल्याचे दिसले. त्यावेळी परिषेदच्या अध्यक्षांना याबाबत संशय आल्याने त्यांनी केंद्र संचालकांना खात्री करण्यास सांगितले. यावर चाऊस यांनी खात्री केल्यावर परीक्षा केंद्रात 20 विद्यार्थी हजर दिसले, तर ऑनलाइन हजेरीत 33 विद्यार्थी हजर होते. इतर 13 विद्यार्थी हे अन्य ठिकाणी बसून परीक्षा देत असल्याचे समजताच परिषदेच्या अध्यक्षांनी याचा अहवाल मागविला. त्याप्रमाणे बीडच्या शिक्षण विभागाने सर्व खात्री करून अहवाल सादर केला.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
एक प्रकार उघड झाल्यानंतर परिषदेच्या अध्यक्षांनी या केंद्रावरील सर्वच परीक्षार्थींची माहिती घेतली. यात 85 विद्यार्थ्यांनी केंद्रात हजर नसतानाही दुसऱ्याच ठिकाणी बसून परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे.
ज्या केंद्रावर हा प्रकार घडला त्यामध्ये ज्ञानदीप कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, वडवणी – 43
प्रगती टायपिंग संस्था, माजलगाव 24,आदित्य संगणक टायपिंग संस्था, माजलगाव 8,गणेश टाइपरायटिंग संस्था, वडवणी 7,इतर 3 विद्यार्थी आहेत.
Leave a Reply