News & View

ताज्या घडामोडी

सलीम ट्रेसरला बीड नगर पालिकेतून शासनाने हाकलले !

बीड- बीड नगरपालिकेतील ट्रेसर व सहाय्यक नगर रचना विभागाचा पदभार असलेले सलीम ट्रेसर यांची बीड येथे करण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत शासनाने त्यांची नियुक्ती रद्द करत त्यांना मूळ जागी परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या लाडक्या सलीमवर कारवाई झालेले खळबळ उडाली आहे

पाटोदा नगरपंचायत येथे नोकरीस असलेल्या आणि बीड मधील अनेक बेकायदेशीर लेआउट गुंठेवारी प्रकरणात करोडो रुपये छापून आपले आणि त्या त्या वेळच्या अधिकाऱ्यांचे व बिल्डर लॉबीचे भले केल्याचा आरोप ट्रेसर सलीम याच्यावर होता. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आमदार होण्यापूर्वी केल्या होत्या त्यामुळे सलीम यांची बदली पाटोदा जामखेड अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाली.

मात्र ट्रेसर पदावर असताना शेकडो बोगस लेआउट आणि गुंठेवारी करून मोठी माया जमवलेल्या सलीम याने प्रत्येक वेळी आमदार क्षीरसागर असो की तत्कालीन नगराध्यक्ष अथवा इतर नगरसेवक किंवा प्रशासनातील अधिकारी या सगळ्यांनाच आपल्या कार्यकर्तृत्व च्या आधारावर आणि लक्ष्मी दर्शनाच्या माध्यमातून गप्प केले त्यानंतर त्याची नियुक्ती पाटोदा येथे झाली.

सलीम हा पाटोदा येथे नोकरीस असला तरी त्याचा जीव बीड नगरपालिकेत अडकला होता त्यामुळे त्याने मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या माध्यमातून आपले कार्यकारणाने क्लीन करत करत बोगस रिपोर्ट तयार करून बीड येथे प्रतिनियुक्ती मिळवली.

ट्रेसर सलीम हा बीड येथे नोकरिस असताना त्याने घरूनच कार्यलय सुरू केले होते,नगर पालिकेचे डुप्लिकेट शिक्के, अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या या माध्यमातून एखाद्या राजकीय पुढाऱ्यापेक्षा जास्त माल छापला.यातील थोडाफार माल बीडला परत येण्यासाठी खर्च केला.

दरम्यान नगर विकास मंत्रायलायाने 14 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात सलीम यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *