बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.
बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती.
दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात मृतदेह आला अन जेसीबी चालकाच्या हातापायातील त्राण गेले.आपण नालीतून कचरा,गाळ नव्हे तर मृतदेह काढला आहे हे पाहून त्याला अन इतर सफाई कामगारांना धक्का बसला.
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तसेच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि इतरांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह पुढील तपासणी साठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
Leave a Reply