News & View

ताज्या घडामोडी

मोदींनी मांडला दहा वर्षाचा लेखाजोखा !

नवी दिल्ली- जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो की राम मंदिर उभारण्याचा विषय,17 व्या लोकसभेने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक रेकॉर्ड केले अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामाचे कौतुक केले.

लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला.ते म्हणले की,17 व्या लोकसभेने अनेक रेकॉर्ड केले आहेत, देश भरभरून आशीर्वाद देत राहिल. भारत आणि लोकशीहीची यात्रा अनेक काळापर्यंत असेल. एक प्रकारे आज आपल्या सर्वांच्या वैचारिक प्रवासाच्या 5 वर्षांचा दिवस आहे, देश आणि देशाला समर्पित केलेला वेळ पुन्हा एकदा मांडायचा आहे. 17 व्या लोकसभेने 5 वर्षांच्या देशसेवेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अनेक आव्हानांचा सामना करूनही प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. G-20 शिखर परिषदेदरम्यान देशातील प्रत्येक राज्याने भारताची क्षमता आणि त्यांच्या राज्याचे गुण जगासमोर मांडले, ज्याचा प्रभाव आजही आहे, G-20 च्या माध्यमातून भारताची लोकशाही व्यवस्था आहे. संपूर्ण जगासमोर सादर केले ते पूर्ण करायचं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी नवी संसद भवन बांधण्याचा निर्णय घेतल्याचे श्रेय लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना दिलं. तुम्ही नि:पक्षपातीपणे काम असं मोदी म्हणाले. कोरोना काळात सर्व खासदारांच्या निधीतून 30 टक्के कपात केली गेली याबाबत बोलताना मोदींनी सर्वांचे आभार मानले. संकटाच्या काळात देशाच्या गरजा लक्षात घेऊन जेव्हा मी खासदार निधी कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा सर्व खासदारांनी क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव मान्य केल्याचं मोदींनी आवर्जुन सांगितलं.

दरम्यान, पाच वर्षात मानवजातीने सर्वात मोठं संकट बघितलं. मात्र या संकट काळात देशाचं काम थांबलं नाही. 17 लोकसभेमध्ये आमच्या सरकारने तृतीयपंथीयांना ओळख देण्याचं काम केलं. त्यासोबतच तीन तलाकबाबत महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. कलम 370 हटवण्यात आलं आणि काश्मिरी लोकांना सामाजिक न्याय देण्यात आला. या पाच वर्षात अनेक ऐतिहासिक कायदे बनवल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *