News & View

ताज्या घडामोडी

गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

बीड- बीड जिल्ह्यातील काही भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.भूगर्भातील हालचालीमुळे हा प्रकार झाला असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे मात्र व्हॉल्कानो डिस्कव्हरी या वेबसाईट ने हा भूकंप असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.गेवराई मध्ये हा भूकम्पाचा केंद्रबिंदू असल्याचा दावा या वेबसाईट ने केला आहे.या भूकम्पाचे हादरे नगर जिल्ह्यातील पाथर्डी,आरणगाव आणि नगर मध्ये जाणवले आहेत.

बीड शहरासह वडवणी,माजलगाव, धारूर,गेवराई या भागात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला.अनेक घरांचे दरवाजे,खिडक्या,पत्रे हादरले.ग्रामीण भागातील लोक रस्त्यावर आले.त्यानंतर हा भूकंप होता की गुढ आवाज याबाबत तहसीलदार सुहास हजारे यांच्याशी संपर्क साधला. भूगर्भात पाणी पातळी कमी झाल्यानंतर असे आवाज येतात हा त्याचाच प्रकार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान गुगल वर याबाबत माहिती घेतली असता Volcano Discovery या वेबसाईटवर गेवराई भागात हा भूकंप झाल्याचे म्हटले आहे.याबाबत सदरील वेबसाईटवर किती रिष्टर स्केल चा हा भूकंप आहे याची नोंद मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान हा भूकंप होता की आणखी काही याबाबत खात्रीलायक माहिती अद्याप मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *