बीड- बीड शहरासह तालुक्यातील अनेक भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.हा आवाज भूकम्पाचा होता की जमिनीतून गूढ आवाज आला याची माहिती प्रशासन घेत आहे.
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरासह आसपासच्या परिसरात गूढ आवाज आला.हा आवाज मोठा होता.काही क्षण जमिनीतून आलेल्या आवाजाने चांगलाच हादरा बसला.बहुतांश ठिकाणी घराच्या खिडक्या,पत्रे हादरले.नेमका आवाज कशाचा झाला याबाबत खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही.
Leave a Reply