बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार लाख रुपयांवर हात साफ केला.
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट दिली.नेमकी एवढी मोठी रोख रक्कम दुकानात कसकाय होती,रोख रक्कम दुकानात का ठेवली असे प्रश्न पोलिसांसमोर पडले आहेत.
Leave a Reply