News & View

ताज्या घडामोडी

शिवसृष्टीला फेरीवाल्यांचा वेढा !राष्ट्रीय सणावाराला साफसफाई सुद्धा नाही !

मुख्याधिकारी अंधारे यांचे अक्षम्य दुर्लक्ष !

बीड- बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांत उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी ला अतिक्रमणाचा आणि फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सुद्धा शिवसृष्टी आणि परिसराची साफसफाई नगर परिषदेने केली नसल्याचे दिसून आले.मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे महापुरुषांच्या स्थळांची दुरावस्था होत आहे.

बीड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वर्षांपूर्वी शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंग या ठिकाणी म्युरल्स च्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत.या ठिकाणी पाण्याचे कारंजे व लाइटिंग करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

हजारो बीडकर आणि शिवप्रेमी नागरिक दररोज आपल्या राजाच्या शिवसृष्टीचे दर्शन घेतात.मात्र गेल्या काही महिन्यांपासून या शिवसृष्टीला फेरीवाल्यांचा आणि अतिक्रमणाचा वेढा पडला आहे.पहाटपासून या भागात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते आलेले गाडे लावतात.ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावर पार्किंग करतात त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा वाहतूक कोंडी होते.

दरवर्षी 26 जानेवारी रोजी संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमाता पूजन केले जाते.यावर्षी या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी अस्ताव्यस्त गाड्या लावल्याने संस्कार भारतीच्या स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

26 जानेवारी रोजी दरवर्षी महापुरुषांचे पुतळे असोत की शिवसृष्टी, भीमसृष्टी या ठिकाणी स्वछता आणि साफसफाई करणे हे नगर परिषद प्रशासनाचे काम आहे.परंतु बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *