आठवडाभरापासून प्लॅनिंग, मामा ने केला गेम !
पुणे- कुख्यात डॉन शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी अवघ्या आठ तासात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना जेरबंद केले आहे.या आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे.अवघ्या महिना भरापूर्वी गँग मध्ये सहभागी झालेल्या मुन्ना पोळेकर ने मामा च्या सांगण्यावरून हा गेम वाजवला.दोन वकिलांनी आठवडाभरपासून याचे प्लॅनिंग केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या हत्येमुळे पुन्हा एकदा पुणेकरांना मुळशी पॅटर्न ची आठवण झाली आहे.
शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. पण आपले बॉडीगार्डच आपला थोड्याच वेळात शेवट करणार आहेत याची शरद मोहोळला पुसटशी देखील कल्पना नव्हती. लग्नाचा वाढदिवस साजरा करुन सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.
शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले. त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या आठ जणांनी सातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं. मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली. या मारेकऱ्यांना शरद मोहोळची हत्या करण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का याचाही तपास पोलीस करणार आहेत. गुन्हेगारी विश्वातून पुण्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सत्तेचे सुरक्षाकवच लाभेल असा शरद मोहोळचा होरा होता. पण स्वतःच्या बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या साथीदारांच्या मनात काय चाललंय हे शरद मोहोळ ओळखू शकला नाही.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा असणारा शरद मोहोळचे आई वडील शेतकरी होते. मुळशी पॅटर्न हा चित्रपट ज्या संदीप मोहोळच्या आयुष्यावर आधारित होता त्या संदीपच्या गाडीवर शरद ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शरद हा संदीप मोहोळचा जवळचा नातेवाईक आहे. संदीपची हत्या गाडीतच गोळ्या घालून झाली होती. तेव्हा शरद मोहोळ गाडी चालवत होता.
२००६ मध्ये पुण्यातील या गँगवॉरची सुरुवात झाली. मारणे गँगच्या सुधीर रसाळला बाबा बोडके गँगमध्ये असणाऱ्या संदीप मोहळने ठार केले होते. या हत्येचा बदला घेताना मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली. गणेश मारणेचा यामागे हात होता.
संदीप मोहोळ गाडीतून जाताना त्याची गाडी अडवून काचा फोडण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर गोळ्या घातल्या होत्या. तेव्हा शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता. संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळची गुन्हेगारी जगतात एन्ट्री झाली. त्यानंतर पुण्यात गँगवॉर वाढले.
शरद मोहोळने संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी २०१० मध्ये किशोर मारणेची हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने शरद मोहोळला जन्मठेपही सुनावली होती. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता.
पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश -गुन्हेगारी विश्वातून तो राजकारणातही शिरकाव करण्याच्या तयारीत होता. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये तो उपस्थितीही लावत असे. विशेष म्हणजे २०११ मध्ये त्याने तुरुंगात बसून गावची निवडणूक बिनविरोध करत स्वत: सरपंच झाला होता. तर गेल्या वर्षी शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Leave a Reply