News & View

ताज्या घडामोडी

वर्षभरातच उखडला चराठा रस्ता !बांधकाम विभागाकडून गुत्तेदाराला पाठीशी घालण्याचा डाव !!

बीड- शहरा नजीक असलेल्या चराठा ते उखंडा रस्त्यावर वर्षभरातच मोठं मोठे खड्डे पडले आहेत.काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी जो कालावधी असतो तो पूर्ण झालेला नसताना आणि काम अर्धवट असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने गुत्तेदाराचे संपूर्ण पेमेंट अदा केले असून खड्डे बुजवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आठ दिवसात खड्डे न बुजवल्यास रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांचे राज्य आहे .बोगस काम करून आपली घर भरण्याचा सपाटा दोघांनी लावला आहे.वर्षभरापूर्वी बीड जवळ असलेल्या चराठा ते उखंडा फाटा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.

जवळपास दहा कोटी पेक्षा अधिक चा निधी यावर खर्च करण्यात आला.विशेष म्हणजे या रस्त्याचे संपूर्ण काम अद्याप झालेले नाही तरीदेखील गुत्तेदाराचे सगळे पेमेंट बांधकाम विभागाने दिले आहे.अवघ्या वर्षभरात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

चराठा ग्रामपंचायत कानी ग्रामस्थांनी अनेकवेळा याबाबत कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत खड्डे बुजवण्यास सुरवात झाली नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

विशेष बाब म्हणजे बीडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे हे चराठा येथील रहिवासी आहेत,त्यांच्याच गावाकडे जाण्याचा रस्ता अत्यंत निकृष्ट झालेला असतानाही ते काहीच कारवाई का करत नाहीत अशी चर्चा होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *