बीड- एक जिल्हाधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या तलाठ्याच्या घरी कार्यक्रमाला सहकुटुंब जातात,तलाठ्याचा थाट पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी यांची पत्नी विचारते की अहो तुम्ही तलाठी का नाही झालात, अर्थात तलाठ्याच ऐश्वर्य पाहून जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे दिपतात,अशीच अवस्था बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे पाहिल्यावर कोणत्याही क्लास वन अधिकाऱ्यांची होईल.
बीड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर नीता अंधारे यांनी ज्या पद्धतीने बेकायदेशीर आणि नियमबाह्य कामांचा सपाटा लावला आहे तो पाहता वरिष्ठांचे देखील डोळे फिरतील.पुरी नावाच्या गुत्तेदाराच्या लायसन वर त्यांनी आपल्या भावाचे कल्याण केले आहे.
पाणी पुरवठा दुरुस्ती असो की रंगरंगोटी करण्याचे काम किंवा किरकोळ दुरुस्ती या नावाखाली अंधारे यांनी एकाच महिन्यात कामे मंजूर केली अन बिले सुद्धा काढली.विशेष म्हणजे हे करताना त्यांनी सलीम ट्रेसर असो की गणेश पगारे यांच्या सारख्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांना बीडला आणण्यासाठी आटापिटा केला.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
एकीकडे बीड शहरातील नागरी सुविधांचा अभाव निर्माण झालेला असताना मुख्याधिकारी अंधारे यांनी मात्र स्वतःची झोळी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे.बेकायदेशीर ले आउट मंजूर करणे असो की नियमबाह्य कामे मंजूर करणे असो,प्रत्येक कामात आपला वाटा मिळाल्याशिवाय फाईलवर सही होत नाही अशी चर्चा नगर परिषदेत सुरू आहे.
प्रशासक म्हणून चांगले काम करून नाव कमावण्याची संधी असताना अंधारे यांनी मात्र नगर परिषद प्रशासनात संपूर्ण अंधार केला आहे.कोणीही या अन टक्केवारी देऊन काम करून घेऊन जा अशा पध्दतीने त्यांनी कारभार सुरू केला आहे.याबाबत अनेक संघटना आणि व्यक्तींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र अंधारे यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष.
Leave a Reply