कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका असलेले आणि विभागीय चौकशी सुरू असणारे गणेश पगारे आणि सलीम ट्रेसर हे दोन कर्मचारी पुन्हा एकदा बीड नगर परिषद मध्ये रुजू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे त्यांना रुजू करून घेण्यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा विशेष आग्रह होता.
बीड नगर परिषद मध्ये नोकरीस असताना अकाउंट विभाग असो की वसुली अथवा इतर विभाग या ठिकाणी अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले कर्मचारी गणेश पगारे आणि ट्रेसर असलेले सलीम यांची बीड नगर परिषद मधून इतरत्र बदली करण्यात आली होती.
पगारे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे तसेच कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण देखील चौकशीसाठी दाखल आहे.तसेच सलीम ट्रेसर यांच्याबद्दल देखील तक्रारी असल्याने त्यांचीही इतरत्र बदली करण्यात आली होती.
मात्र बीड नगर परिषद मध्ये प्रशासक आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या नीता अंधारे यांनी पगारे आणि सलीम यांच्यासाठी आपले वजन खर्ची घालत त्यांना बीडमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
या नीता अंधारे नगर परिषद च्या जिल्ह्याच्या डीपीओ असताना त्यांनीच पगारे यांच्याविरोधात अहवाल दिला होता.मात्र त्या मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आता त्यांनीच पगारे यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Leave a Reply