परळी- शिवसेनेच्या उबाठा गटाने नव्याने तीन जिल्हाप्रमुखांची निवड जाहीर केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.या निवडीनंतर उबाठा गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची अंधारे सेना केली आहे अस म्हणत जिल्हाप्रमुख पदासाठी चाळीस लाखाची मागणी करण्यात आली होती असा खळबळजनक आरोप तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे.
बीडच्या परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. बीड जिल्ह्यात उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करत नवीन तीन जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली, या निवडीवर नाराजी व्यक्त केल्याने सुषमा अंधारेंच्या विरोधातील गटबाजी उफाळून आली आहे.
सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज परळीतील तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. तसेच व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेत.
जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखाच्या निवडीमध्ये 40 लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली आहेत. सुषमा अंधारे या पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष संपवण्यासाठी काम करत आहेत, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
- एकनाथ शिंदे यांचा राजीनामा!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
ज्यांच्यावर केजचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे त्या रत्नाकर शिंदे यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे,असे असताना अंधारे यांनी त्यांच्यासाठी फिल्डिंग लावली असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
Leave a Reply