बीड- गेल्या चार पाच वर्षांपासून आपल्या संस्थेतील एका सेक्सरॅकेट मध्ये सहभागी असलेल्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन मीडियामध्ये बोंबाबोंब झाल्यानंतर जागे झालेल्या मिलिया च्या ट्रस्टीनी बुधवारी मुस्लिम समाजातील काही पत्रकारांसोबत सचिवांच्या घरी बैठक घेतली.कौम का मामला है,हमे मदत करो अस म्हणत उपस्थित पत्रकारांना आपली बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बीड शहरातील अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेत नोकरीस असलेल्या आमिर काझी या शिक्षकाने काही महिलांसोबत अश्लील चाळे करत त्यांचे व्हिडीओ बनवून लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडला.
याबाबत न्यूज अँड व्युज ने बातमी नावासह दिल्यानंतर एकच खळबळ उडाली.गेल्या चार पाच वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे.केवळ आमिर काझीच नाही तर इतरही दोन तीन शिक्षक यांनी हे असले कुटाणे केले आहेत.
मात्र हे सगळं माहीत असून सुद्धा संस्थेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.एकप्रकारे त्याला पाठिशी घालण्याचा प्रकार केला.त्यानंतर स्थानिक वर्तमानपत्र आणि मीडिया मधून याबाबत ओरड झाली.त्यावेळी संस्थेने बुधवारी मुस्लिम समाजातील काही ठराविक पत्रकार आणि संपादक यांना मिलियाच्या सचिव यांच्या घरी पाचारण केले.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
या ठिकाणी जमलेल्या पत्रकारांना सचिव मॅडम आणि त्यांच्या नातलगांनी आपली बाजू कशी खरी आहे आणि तुम्ही कौम चे माणस आहेत अस म्हणत आपली बाजू मांडण्याचा आग्रह धरला.ही बैठक आयोजित करणाऱ्या सिनियर पत्रकारांनी देखील संस्थेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान जर संस्थेची बाजू खरी असेल त्यांनी आपल्या कौम च्या पत्रकारांना घरी बोलावून घेण्यामागे काय हेतू होता.जर तुम्ही निर्दोष आहात तर त्या शिक्षकाला इतकी वर्षे का पाठीशी घातले.असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Leave a Reply