News & View

ताज्या घडामोडी

पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

मुंबई-2024 या पुढील वर्षी राज्य शासनाकडून तब्बल 24 शासकीय सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमस या दरम्यान या सुट्या असतील.पुढील वर्षी दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी आहे.

राज्य सरकारने तब्बल दोन महिने अगोदर पुढील वर्षातील शासकीय सुट्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार, महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार,होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार, गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार, गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार,रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार,रामनवमी १७ एप्रिल बुधवार.

महावीर जयंती २१ एप्रिल रविवार,महाराष्ट्र दिन १ मे बुधवार, बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार,बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार,मोहरम १७ जुलै बुधवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार,पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार, गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार,ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार,दसरा १२ ऑक्टोबर शनिवार दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार,दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार,गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *