News & View

ताज्या घडामोडी

आ रोहित पवार सहकुटुंब साजरा करणार बीडमध्ये पाडवा !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आ रोहित पवार मैदानात उतरले आहेत.स्वतः पवार हे दिवाळी पाडवा बीडमध्ये सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत साजरा करणार आहेत.आ पवार आणि आ संदिप क्षीरसागर यांच्या या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार व कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बीड मध्ये साजरा करणार आहे. यासाठी मंगळवार (दि. १४ नोव्हेंबर) रोजी बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे स्नेहमिलन व पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


सध्याच्या राजकीय गोंधळ सुरु असलेल्या काळात आपल्या एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांसोबत दिवाळीचा सण आनंदाने साजरा करून त्या निमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडचणी व विविध विषयांवर मुक्त संवाद साधण्यासाठी व त्यांच्याशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी मंगळवार (दि.१४ नोव्हेंबर ) रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे सकाळी १०:३० वा. स्नेहमिलन व पानसुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्या परिवारासह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *