बीड- जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक म्हणून डॉ अशोक बडे रुजू झाले असले तरी केवळ मागचे बिल मंजूर करण्यापलीकडे त्यांचे कुठेच लक्ष नाही.त्यामुळे जळगाव ला वादग्रस्त ठरलेले डॉ नागेश चव्हाण हेच रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत.त्यामुळे नेमकं सीएस कोण बडे की चव्हाण अशी चर्चा होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात डॉ सूर्यकांत साबळे यांचे निलंबन झाल्यानंतर नागेश चव्हाण यांच्याकडे पदभार आला.महिनाभरात डॉ चव्हाण यांनी मागचा पुढचा सगळा हिशोब पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः स्वतःच्या घराच्या लाईट फिटिंग चे बिल त्यांनी रुग्णालयातून काढले.
त्यांच्या कारभाराचा लौकिक धनंजय मुंडे यांच्या पर्यंत पोहचल्याने डॉ अशोक बडे यांची नियुक्ती झाली. मात्र बडे हे केवळ मागची बिले काढण्यासाठी आले आहेत की काय असे आता वाटू लागले आहे.कारण त्यांच्या कार्यलयात गुत्तेदार अन गुत्तेदारी करणारे पत्रकार याचाच वावर वाढला असल्याचे चित्र आहे.
डॉ नागेश चव्हाण हर त्यामुळे आपला मनमानी कारभार करत आहेत.जळगाव येथे अनेक कुटाणे करून आठ तर दहा प्रकरणात विभागीय चौकशी मानगुटीवर घेऊन बीडला आलेले चव्हाण यांनी आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
चव्हाण हे सीएस असल्याच्या थाटात कारभार करत असल्याने कर्मचारी देखील संभ्रमित झाले आहेत.
Leave a Reply