News & View

ताज्या घडामोडी

बीड मतदारसंघातील ग्रामपंचायत वर काका पुतण्याचा दावा !

बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत बीड मतदारसंघात निकाल लागले.यामध्ये आ संदिप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे.दोघांनीही दावा केल्याने नेमकी सत्ता कोणाची आली याबद्दल चर्चा होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात बीड मतदारसंघातील ७ ग्रामपंचायतींमध्ये आ.संदीप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळविले. याबद्दल विजयी उमेदवारांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


बीड मतदारसंघ क्षेत्रातंर्गत बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा, ढेकनमोह तांडा, बाळापूर, पोखरी घाट तर शिरूर-कासार तालुक्यातील हिवरसिंगा, पाडळी, जांब या ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. सदरील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सरपंच पदासाठी विजयी झालेले उमेदवार

पोखरी घाट ग्रामपंचायत – बिभीषण मुळूक
लक्ष्मीआईतांडा ग्रामपंचायत – अनिता राठोड
ढेकनमोह तांडा ग्रामपंचायत – शेषेबाई पवार
बाळापूर ग्रामपंचायत – चांगदेव गालफाडे
हिवरसिंगा ग्रामपंचायत- ज्योती विजय शिंदे
पाडळी ग्रामपंचायत – गहिनीनाथ पाखरे
जांब ग्रामपंचायत – भरत भीमराव नागरगोजे

बीड मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीवर
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व

बीड मतदार संघातील एकूण १७ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने चांगलीच बाजी मारली आहे. बीड तालुक्यातील ४, शिरूर(का.) तालुक्यातील ७ आणि केज तालुक्यातील २ अशा १३ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री क्षीरसागर गटाने वर्चस्व मिळवले आहे. आजही ग्रामीण भागातील जनतेने माजी मंत्री क्षीरसागर यांनाच कौल दिला आहे.

बीड मतदार संघातील १७ ग्रामपंचायतची निवडणूक रविवारी झाली आणि सोमवारी निकाल जाहीर झाला. यात १७ पैकी ११ ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने दणदणीत विजय मिळवला असून बीड तालुक्यातील ४, शिरूर(का.) तालुक्यातील ७ आणि केज तालुक्यातील २ ग्रामपंचायतच्या निकालात मोरगाव- सौ.लताबाई लिंबाजीराव जाधव, घोडका राजुरी – सौ.बारकूबाई चंद्रसेन घोडके, लक्ष्मीआई तांडा – सौ.अनिता राजेंद्र राठोड, वासनवाडी – सौ.सुदामती सतीश शिंदे, पाडळी – गहिनीनाथ पाखरे, हिवरसिंगा – सौ.ज्योती विजय शिंदे, तागडगाव – सौ.सुरेखा नवनाथ सानप, मलकाचीवाडी/ढोरकडवाडी – सौ.कुसुमबाई शहादेव चव्हाण, खांबालिंबा – बालाजी गिते, आर्वी – सौ.मीरा यादव, जांब/ढोकवड – सौ.राधा नागरगोजे यांचा आणि नाळवंडी ३ सदस्य, ढेकणमोहा तांडा ३ सदस्यांचा दणदणीत विजय झाला असून केज तालुक्यातील नांदूरघाट आणि काळेगाव घाट या ग्रामपंचायती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *