जालना- मागील नऊ दिवसापासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची पकृती बिघडली आहे.उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली असल्याचे डॉक्टर मंडळी नी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे.
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
- अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!
- आजचे राशीभविष्य!
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांची दिवाळी रुग्णालयाच होईल असं दिसतंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील जास्त घटलं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.





Leave a Reply