बीड- बीड शहरातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था म्हणजे सरकारच्या लायसन वर सुरू असलेली खाजगी सावकारकी असल्याचे समोर आले आहे.मात्र त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने हे मल्टिस्टेट अन पतसंस्थेचे मालक मोकाट झाले आहेत.कोट्यवधी रुपयांच्या ठेवी हाताशी असल्याने यांचे इतर उद्योग फोफावले आहेत.या माध्यमातून मनी लोन्ड्रीग होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय सहकार विभागाकडे झाल्या असल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.बहुतांश मल्टिस्टेट आणि पतसंस्था मध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे.मात्र त्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याचे देखील दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात मातोश्री,परिवर्तन,जिजाऊ माँ साहेब अशा पतसंस्था आणि मल्टिस्टेट बंद पडल्या. हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडवून हे लोक फरार झाले.आजही येथील ठेवीदार पोलीस स्टेशन आणि सहकार विभागाकडे चकरा मारून मारून बेजार झाले आहेत.
मल्टिस्टेट बाबत माहिती घेतली असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीडमधील अनेक मल्टिस्टेट आणि पतसंस्था या खाजगी सावकारांचे दुकान झाले आहे.12 ते 13 टक्यानी ठेवींवर व्याज द्यायचे,कोट्यवधी रुपये गोळा करायचे अन ते कर्जाने देण्यापेक्षा आपल्या धंद्यात लावायचे असले उद्योग या लोकांनी सुरू केले आहेत.
ज्ञानराधा मल्टिस्टेट बाबत अफवा पसरल्यानंतर सुरेश कुटे यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले.जिजाऊ माँ साहेब बंद झाल्यानंतर बहुतांश मल्टिस्टेट मधून ठेवीदारांनी पैसे काढून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष बाब म्हणजे यातील काही मल्टिस्टेट आणि पतसंस्था मध्ये बीडमधील अनेक गड आणि देवस्थानचे पैसे अडकून पडले आहेत.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
मल्टिस्टेट च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनी लोन्ड्रीग सुरू आहे.येथील पैसा प्लॉटिंग,कारखाने,जमिनीत गुंतवण्यात आला आहे.जेवढ्या ठेवी त्या तुलनेत कर्ज वाटप केले असेल तर हा व्यवसाय सुरळीत चालतो,मात्र बहुतेक ठिकाणी ठेवींच्या तुलनेत कर्जवाटप अत्यल्प आहे,इतर ठिकाणीच जास्त पैसा गुंतवणूक केला आहे,त्यामुळे या मल्टिस्टेट आणि पतसंस्था देखील डबघाईला आल्या आहेत.
मल्टिस्टेट च्या माध्यमातून होणारी मनी लोन्ड्रीग रोखण्यासाठी काही ठेवीदारांनी थेट दिल्लीपर्यंत धडक मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply