News & View

ताज्या घडामोडी

मी पडले आता इतरांना पाडणार -पंकजा मुंडे !

सावरगाव घाट – मी पडले ते झालं आता पाडणार आहे.पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्याला पाडणार,समाजसाठी सेवा करणाऱ्याला मदत करणार.2024 पर्यंत मी मैदानात आहे.चारित्र्यहीन असणाराना पाडणार. आता मी घरी बसणार नाही.

सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,का आलात तुम्ही असा सवाल करत मला खुर्ची मिळाली म्हणून आलात की भगवान बाबा साठी आलात अस म्हणत त्यांनी सभेला सुरवात केली.राजकारण मी करावं का सोडून द्यावं. शिवशक्ती परिक्रमा केली तेव्हा मला वाटलं नव्हतं एवढं प्रेम मिळेल.माझ्या कातड्याचे जोडे केले तरी तुमचे उपकार मी फेडू शकणार नाही.माझ्या कारखाण्यावर जेव्हा रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसात अकरा कोटी रुपये जमा केले.याबद्दल तुमचे आभार.जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही.न जाने कैसे परखता है मेरा उपरवाला हा डायलॉग त्यांनी मारला.

सगळ्या जातीचे लोक आलेत.शेतकरी सुखी आहे का?विमा मिळाला का? अनुदान मिळालं का?शेतमजुरांना काम आहे का ? ऊसतोड कामगार आलेत का? ऊस तोडणार का?पैशात वाढ झाल्याशिवाय ऊस तोडायला जाणार नाहीत .

राज्यात गंभीर प्रश्न आहेत,मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना,ओबीसी चा प्रश्न गंभीर होत असताना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते. जनतेची काळजी घे अस मुंडे मला म्हणले होते.मी पैसे घेणार नाही पण आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही.माझ्यावर जनतेचा देखील हक्क आहे.

कोकणापासून ते मराठवाडा इथल्या वंचितासाठी काम केलं.कधी जात,धर्म पाहिलं नाही.निवडणुकीत पडले.मी कोणाच्याही कुबड्या घेतल्या नाहीत.माझ्या जनतेने कुबड्या दिल्या.मी मनाने खचले नाही.तुमची सेवा करण्यात खंड पडला.माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो.दरवेळी आशा लावता आणि दरवेळी पदरात निराशा पडते.मी दोन महिन्याची रजा घेतली तेव्हा रोज आरोप सुरू होते.अनेकांनी सल्ले दिले.माझी निष्ठा लेचीपेची नाही.

मी युद्धाला तयार आहे.आपल्याला त्रास देणाऱ्याच घर उन्हात बांधू, शंकर भोळा आहे पण त्यालाही तिसरा डोळा आहे.नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं हे देशहिताच नाही हे भागवत यांनी सांगितले.जिंकण्यासाठी निष्ठा ,नीतिमत्ता गहाण ठेवू शकत नाही.

पाच वर्षे झाले,यामध्ये मी खूप फिरले,मध्यप्रदेश, परळी व राज्यात फिरले.भगवान बाबाला सुद्धा गड सोडावा लागला.तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहे त्याच उत्तर मी शोधते आहे. माझा जीव तुमच्यात अडकला आहे.तुम्हाला न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंडे यांचे स्मारक अजून बनलेले नाही,नका बनवू.शेतकऱ्यांना आधार द्या.धर्माच्या,जातीच्या भिंती पाडा हेच मुंडेंच स्मारक आहे.जातीपातीच्या राजकारणाला बाजूला ठेवणार नेतृत्व हवं आहे.राज्याला स्थिरता हवी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.त्यासाठी मी मैदानात उतरणार आहे.

मी पडले ते झालं आता पाडणार आहे.पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्याला पाडणार,समाजसाठी सेवा करणाऱ्याला मदत करणार.2024 पर्यंत मी मैदानात आहे.चारित्र्यहीन असणाराना पाडणार. आता मी घरी बसणार नाही.अस म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *