News & View

ताज्या घडामोडी

डॉ साबळे यांचे निलंबन रद्द !

बीड- बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे करण्यात आलेले निलंबन आज 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने रद्द ठरविले आहे.यामुळे आता डॉ. सुरेश साबळे हे पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार आहेत.

डॉ. सुरेश साबळे यांच्यावर कंत्राटी भरतीचा ठपका ठेवत आरोग्य मंत्र्यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. याला डॉ. सुरेश साबळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद बेंचमध्ये आव्हान दिले होते. याची सुनावणी न्या. पी आर बोरा यांच्यासमोर झाली. सुनावणीअंती डॉ. साबळे यांना निलंबित करण्याइतपत प्रथमदर्शनी पुरावे नसल्याचे सांगत मॅटने सदरचे निलंबन आदेश रद्द केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *