News & View

ताज्या घडामोडी

ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

बीड- शहर वाहतूक असो की जिल्हा वाहतूक शाखा ,या शाखेला राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावरील धाबे किंवा हॉटेल तपासणीचे अधिकार आहेत का ? निश्चितच नाहीत,मात्र बीडमधील ट्रॅफिक पोलीस शासकीय वाहनातून जालना रोडवरील धाब्यावर धाडी टाकल्याचे दाखवून तोडीपाणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बीड शहर आणि जिल्हाभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले.यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीच्या मार्गावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलीस घेत होते.

मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात राहावी यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी चौकात तैनात होते.मात्र काही कर्मचारी हे जालना रोडवर धाबे आणि हॉटेल ला भेट देऊन जेवण्यास बसलेल्या ग्राहकांना हाकलून लावत हॉटेल,धाब्यांची तपासणी करत असल्याचे पाहायला मिळाले.

वाहतूक शाखेच्या वाहनातून चार ते पाच कर्मचारी जालना रोडवर काही धाब्यावर जाऊन दारू पिणारे कोणी आहेत का? दारू विक्री सुरू आहे का? याची विचारणा करून हॉटेल/ धाबे मालकाशी तोडीपाणी करत आपले खिसे भरत असल्याचे पहावयास मिळाले.

ट्रॅफिक पोलिसांना दारू किंवा धाबे तपासण्याचे अधिकार आहेत का,नसतील तर हे कर्मचारी कोणाच्या सांगण्यावरून तपासणी करत होते.याची कल्पना वरिष्ठांना होती का? असेल तर एसपी नंदकुमार ठाकूर काही कारवाई करणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरण सुद्धा दुर्लक्षित करणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *