News & View

ताज्या घडामोडी

ऐतिहासिक निर्णय ! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर !

नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश इतक्या मोठ्या मताने मंजूर झाले.2026 नंतर जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन 2029 पासून याची अंमलबजावणी होईल.

केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत हे विधेयक मांडले.आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच कायद्यात रुपांतरण झालं आहे. 2 मते आरक्षणाच्या विरोधात पडली आहेत.

 पहिल्यांदा महिलांना स्थानिक निवडणुकींमध्ये महिलांना आरक्षण मिळणार आहे. दिवंगत राजीव गांधी यांनी पहिल्यांदा हे विधेयक संसदेत मांडलं होतं. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा भावनिक क्षण आहे. राजीव गांधी यांचं अर्ध स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. काँग्रेसकडं देशभरात मोठ्या प्रमाणात महिला नेत्या आहेत. त्यांना महिला आरक्षण विधेयकाचा लाभ होणार आहे, असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलं.

महिला आरक्षण विधेयक ही काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरुन चांगलचं राजकारण रंगलं आहे. या महिला आरक्षण विधेयकाचं श्रेय घेण्याची चढाओढ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरु आहे. आज काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकावर हक्क सांगितल्यानंतर भाजपाकडून चांगलीच टीका करण्यात आली. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस विरोधात चांगलाच हल्लाबोल केला. निशिकांत दुबे बोलण्यास उभे राहिल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे निशिकांत दुबे यांनी काँग्रेस श्रेय लाटण्यासाठी चढाओढ करत असल्याचं सदनात स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *