News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्हा परिषदेने आजोबांच्या जागेवर चक्क नातवाला दिली अनुकंपावर नोकरी !

प्रमोद काळे आणि अजित पवारांचे जाताजाता केलेले कुटाणे उघड !

बीड- शासकीय नोकरीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना किंवा मुलींना अथवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते हा नियम आहे मात्र नियमानुसार काम न करता बेकायदेशीर काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेने केलेला एक कुटाणा न्यूज अँड व्ह्यूच्या हाती लागला आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आजोबांच्या जागेवर चक्क नातवालाच अनुकंपाची नोकरी बहाल केली आहे बरं झालं अजित पवार हे प्रशासनात आहेत राजकारणात असते तर त्यांनी महाराष्ट्र चोरला पण याच्या नावावर करून द्यायलाही कमी केले नसते.

बीड जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी अनेक नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामे केली आहेत यापूर्वीही न्यूज अँड व्युज अनेक प्रकरणात पाठपुरावा केला होता मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हेच काळे यांच्यासोबत वाटेकरी असल्याने कारवाई कुठलीच झाली नाही.

दरम्यान बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक लिपिक म्हणून काळे आणि पवार यांनी चक्क नियमबाह्य भरती केली आहे शेख मोहसीन शेख मोईन या व्यक्तीला त्याचे आजोबा नोकरीत असताना मयत झाल्याच्या कारणावरून अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे जे बेकायदेशीर आहे

शेख इस्माईल शेख रहमान हे बीड जिल्हा परिषदेत सफाई कामगार म्हणून नोकरीस होते शासकीय सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या मुलाने किंवा मुलींनी नोकरीसाठी अर्ज करणे अपेक्षित होते परंतु चक्क त्यांच्या नातवाने म्हणजेच शेख मोहसीन याने नोकरीसाठी अर्ज केला

अनुकंपा तत्वावर नोकरी करायचे असेल किंवा द्यायची असेल तर मृत व्यक्तीच्या पती अथवा पत्नी मुलगा किंवा मुलगी जे कोणी वारस असतील त्यांना नोकरी करता येते किंवा नोकरीत घेता येते बीड जिल्हा परिषदेत मात्र प्रमोद काळे यांनी शेख मोहसीन याच्या नियुक्तीची फाईल स्वतः फिरवली आणि लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी त्यास मंजुरी दिली दरम्यान या प्रकरणात आता नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी चौकशी सुरू केली असून नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

दरम्यान शेख मोहसीन यांच्यासोबतच आणखी एका व्यक्तीला अशा पद्धतीने बेकायदेशीर कागदपत्र जोडून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीड जिल्हा परिषदेत प्रमोद काळे आणि अजित पवार यांनी जो काही नंगानाच केला आहे तो निस्तरता निस्तरता पाठक हैराण झाले आहेत हे नक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *