News & View

ताज्या घडामोडी

साठ हजार कोटींच्या योजनांची घोषणा !

छत्रपती संभाजीनगर- मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 60 हजार कोटींच्या योजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस 29 मंत्री उपस्थित होते. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सिंचन,कृषी,उद्योग,महिला बाल कल्याण यासाठी 45 हजार कोटींची घोषणा करण्यात आली.

महत्वपूर्ण घोषणा पुढीलप्रमाणे …………………!

  • आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी साखळी सिमेंट बंधारे तसेच अंबड प्रवाही योजना दिंडोरी जिल्हा नाशिक. आज १४ हजार कोटी रुपयांचे निर्णय फक्त सिंचनासाठी घेतले.
  • पश्चिमवाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावर १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली
  • सार्वजनिक बांधकामविभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख दिले आहेत.
  • महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा झाली
  • आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करु
  • कृषी, क्रीडा. पर्यटनासह सर्व विभागाला निधी
  • मराठाड्याती ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणार, यासाठी २८४ कोटींचा निधी लागले.
  • पुणे संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवणे – १८८ कोटींचा निधी
  • पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी १५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला
  • शनी देवगाव उच्च पातळी बंधारा – २८५ कोटी
  • परभणीच्या पाथरीतील साईबाब तीर्थक्षेत्र विकास आराखडा – ९१.८० कोटी
  • औढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास – ६० कोटी
  • मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३ हजार २२५ कोटी रुपयांची निधी
  • परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे वसंतराव नाईक सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता.
  • परळी वैद्यनाथ मंदिराच्या 286 कोटींच्या विकास आरखड्यास मंजुरी
  • वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान ५ आणि कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप..एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप.मराठवाड्यातील १ हजार ३० कि मी लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *