News & View

ताज्या घडामोडी

पोळ्याच्या सणावर लम्पिचे सावट ! बाजार भरवण्यास बंदी !!

बीड -बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमधील 168 ठिकाणी लंपी चर्मरोग लागण झाल्याने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उद्या दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होत आहे सदरील रोग हा संसर्ग असल्याने इतर पशुधनास त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी सणानिमित्त जनावरे एकत्रित आणण्यास व एकत्रितपणे मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात येत आहे.


जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी प्राण्यांमधील संक्रमण आणि रोगप्रतिबंध अधिनियम 2009 नुसार हा मनाई आदेश जारी केला आहे.
सर्व तालुक्यातील बैलपोळा सणानिमित्त एकत्रित येणे व मिरवणूक यावर मनाई करण्यात येत आहे जिल्ह्यातील पशुपालक व शेतकरी यांनी घरगुती स्वरूपात बैलपोळा सण साजरा करण्यावर भर द्यावा व जनावरे एकत्रित आणू नये असे कळविण्यात येत आहे.


बीड जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचे १६६ इपी सेंटर मध्ये एकूण ९७९ रोगाची लागण झालेले पशुरुग्ण आहेत.सध्यस्थितीत गोवर्गीय पशुधनामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असलेबाबत निदर्शनास आले आहे.


जिल्हाधिकारी बीड यांनी लंपी चर्मरोग संदर्भात प्रतिबंधक नियंत्रण व निर्मुलन करणेसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ( अ ) दिनांक १७.६.२०२२ अन्वये प्रदान अधिकारानुसार बीड जिल्ह्यातील लंपी चर्मरोग प्रतिबंधक नियंत्रण व निर्मुलनासाठी शेळी/मेंढी चे बाजार वगळता पशुंचे सर्व बाजार गोवर्गीय व इतर पशुधनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *