News & View

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय !

जालना- मराठा आरक्षणाच्या विषयावरून गेल्या पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवली या ठिकाणी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या ठरावानंतर त्यांनी आपले उपोषण तीस दिवसासाठी मागे घेत असल्याचे जाहीर केले.जर आरक्षण दिले नाही तर सरकारला धडा शिकवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.उपोषण मागे घेत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी म्हटले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपोषण सोडण्यासाठी आल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.जरांगे पाटील यांचा हेतू प्रामाणिक असून पोरगा भारी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषण दरम्यान लाठीचार्ज झाल्याने अनेक आंदोलक,महिला,लहान मूल जखमी झाले होते.

त्यानंतर आक्रमक झालेल्या जरांगे पाटील यांनी लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा,गुन्हे मागे घ्या,आरक्षण तात्काळ लागू करा अशी मागणी करत अन्न पाणी सोडले होते.

याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच आघाडीच्या नेत्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर सरकारने दोनवेळा आरक्षणाबाबत जी आर काढला होता.तरीदेखील जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम होते.

दरम्यान सोमवारी रात्री उशीरा सर्वपक्षीय बैठकीत गुन्हे मागे घेणे,तीन अधिकाऱ्यांना निलंबित करणे आणि महिनाभरात आरक्षणाचा सकारात्मक विचार करणे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

त्यानंतर मंगळवरी सकाळी उपोषण स्थळी संभाजी भिडे गुरुजी यांनी आपला पाठिंबा देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. दुपारी दोन नंतर पाटील यांनी मीडिया समोर येत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांनी अंतरवली येथे भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,आम्हाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे आभार, सन्मानही करतो. आरक्षण हा तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला न्याय देतील. मराठा समाजाला तुमच्याविषयी आशा खूप आहे, धाडसी निर्णय घेण्याची क्षणात फक्त एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. मराठा समाजाच्या निर्णयाशिवाय इतर निर्णय सुद्धा शिंदे यांनी धाडसांनी घेतले.ते आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत.

मी तुम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे मी वागणार, तुमच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यांनी एका महिन्याचा वेळ मागितला. मी सगळ्या समाजाला विश्वासात घेतले. ५० हजारापेक्षा जास्त लोकं उपस्थित होते. मी लोकांशी चर्चा करून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *