News & View

ताज्या घडामोडी

मराठा आरक्षण,मुख्यमंत्री शिंदेंची महत्वपूर्ण घोषणा !

मुंबई-मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर एकमत झालं. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सर्वांनी आग्रह धरला.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत बैठकीत चर्चा झाली.मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.जरांगे पाटील यांना सर्वपक्षीय विनंती.थोडावेळ देण्याची विनंती. उपोषण मागे घेण्याचा ठराव करण्यात आला. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरक्षणाबाबत जी समिती केली आहे त्यामध्ये जरांगे यांनी सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे. लाठीहल्ला प्रकरणात दोषी असलेल्या खाडे, आघाव यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण बाबत सरकार सकारात्मक आहे.कायद्याच्या चौकटीत टिकाव यासाठी प्रयत्न केले जातील.न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या समितीची बैठक पार पडली आहे.या समितीत जरांगे पाटील यांच्या वतीने किंवा ते स्वतः निमंत्रित असतील असे निर्णय घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *