News & View

ताज्या घडामोडी

गेवराई खून प्रकरणी आठ आरोपींना जन्मठेप !

बीड- ढोलकीच्या वादातून घडलेल्या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी एस पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली.

गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती.ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली.

त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज याने तुकारामाच्या घरी जाऊन ढोलकी का आणली म्हणून त्याला मारहाण केली.दुसऱ्या दिवशी पुन्हा तुकाराम च्या घरी जाऊन लाकूड,काठ्या व लाथा बुक्याने मारहाण केली. यामध्ये तुकाराम गंभीर जखमी झाला.

त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी ए एस आय सांगळे यांच्या फिर्यादीवरून धर्मराज माळी,बाळू माळी,महादेव पवार,बाळू पवार,भागवत माळी,भीमा माळी,बबन माळी,येनुबाई पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

2014 साली घडलेल्या या प्रकरणात गेवराई न्यायालयात खटला चालला.त्यानंतर अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आले.सरकार पक्षाच्या वतीने 13 साक्षीदार तपासण्यात आले.न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार दंड ठोठावण्यात आला.या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड अजय राख यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *