बीड- राजकीय विरोधामुळे तब्बल तेरा वर्षांपासून सण वार उत्सवात कधीही एकटर्न आलेले मुंडे बहीण भाऊ यावर्षी राखीपोर्णिमा निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले.मंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा,प्रीतम आणि यशश्री कडून राखी बांधून घेतली.यावेळी काकू प्रज्ञा मुंडे यांचे आशीर्वाद देखील घेतले.या कौटुंबिक सोहळ्यामुळे तेरा वर्षांनी मुंडे कुटुंब एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
2009 साली परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांनी अर्ज भरला आणि मुंडे कुटुंबात फूट पडली.धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारण सुरू केले.गेल्या तेरा वर्षात अनेकवेळा या बहीण भावांनी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप केले.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
मात्र अलीकडच्या वर्ष दीड वर्षात या दोघांमधील कटुता बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.धनंजय मुंडे यांनी 2 जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले होते.
30 ऑगस्ट रोजी धनंजय मुंडे यांनी थेट बहिणीच्या घरी जात राखीपोर्णिमा साजरी केली.पंकजा ,प्रीतम आणि यशश्री या तिन्ही बहिणींनी आपल्या भाऊरायाला राखी बांधत तोंड गोड केले.यावेळी प्रज्ञा मुंडे यांचे आशीर्वाद धनंजय मुंडे यांनी घेतले.
Leave a Reply