बीड- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासोबत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारा आणि जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ करण्यासाठीचा मास्टरमाइंड असणारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहाय्यक एपी भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे पवारांची बदली झाल्यानंतर नामदेव उबाळे असो की भेंडेकर या बगल बच्छावर कारवाईस सुरुवात झाली आहे
बीड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजनेचा तत्कालीन सी ओ अजित पवार नामदेव उबाळे आणि राव वीर या मारलाड यासह ग्रामीण पाणी पुरवठ्यातील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः बट्ट्याबोळ केला जवळपास चौदाशे कोटी रुपये खर्च करून बाराशे पेक्षा अधिक गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना या माध्यमातून केली जाणार होती
मात्र अजित पवार आणि त्यांच्या बगल बच्चांनी या योजनेत मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला अक्षरशः ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने इस्टिमेट तयार करून शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार केला गेला यामध्ये आघाडीवर होते ते नामदेव उबाळे अजित पवार आणि कनिष्ठ सहाय्यक एपी भेंडेकर
दरम्यान सी ओ अजित पवार यांची बदली झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून नामदेव उबाळे गायब असून भेंडेकर यांच्यावर नूतन सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे पाठक यांनी जॉईन झाल्यापासून जलजीवन मिशनमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही गुत्तेदारांनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे तक्रारही केली होती दरम्यान पाठक यांनी भेंडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जलजीवन मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
एपी भेंडेकर यांच्या ऑनलाइन पेमेंट चे स्टेटमेंट अविनाश पाठक यांनी मागून घेतल्यास कशा पद्धतीने भेंडेकर हे प्रत्येक गुत्तेदाराकडून किमान दहा हजार ते जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन स्वीकारल्याशिवाय त्याचे काम करत नव्हते हे उघडकीस येईल याच भेंडेकर आणि उबाळे यांच्या माध्यमातून तत्कालीन सीईओ पवार यांनी देखील मोठी माया जमा केली पाठक यांनी भेंडेकर यांचे बँक स्टेटमेंट मागून घेत त्याचीही चौकशी करण्याची गरज आहे
Leave a Reply