News & View

ताज्या घडामोडी

धनंजय चा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिलाय- अजित पवार !

बीड- माझे सहकारी मंत्री बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा संघर्ष मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे.या जिल्ह्याने स्व गोपीनाथ मुंडे अन विलासराव देशमुख यांची मैत्री पाहिली आहे,आता पवार अन मुंडेंची मैत्री पाहत आहेत.धनंजय च्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचा मी शब्द देतो अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीडकर जनतेला आश्वासित केलं.

बीड येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी विकासासाठी आपण महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचे सांगितले. टीका करणाऱ्यांना मी कामातून उत्तर देतो,तो माझा स्वभाव आहे.बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी गोदावरी नदीवर बंधारे बांधले,लवकरच सिंदफणा नदीवर बंधारे बांधण्यासाठी बैठक घेऊ.

बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी मोठे काम केले आहे.2019 च्या निवडणुकीत तो राज्यात सभा घेत होता पण परळीमधून जनतेने त्याला कामाची पावती दिली.सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून काम करताना त्याने स्व गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळासाठी आग्रह धरला,मी त्याला निधी दिला.

धनंजय मुंडे यांचा संघर्ष मी 2012 पासून पाहतो आहे.त्याची भाषणाची एक स्टाईल आहे,ती लोकांना आवडते.आम्ही हा निर्णय का घेतला हे मी यापूर्वी सांगितले आहे.विकास करायचा असेल,प्रश्न सोडवायचे असतील तर देशात अन राज्यात एकाच विचारांचे सरकार असायला हवे म्हणून आमहो सोबत गेलो.

यापुढच्या काळात बीड जिल्हयाचा पालकमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल अस सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील नव्या जबाबदारी ची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *