News & View

ताज्या घडामोडी

ते आमचे संस्कार नाहीत – धनंजय मुंडे यांनी लगावला टोला !

बीड- शरद पवार यांच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकांनी बोलताना भान सोडलं,जातीचा उल्लेख केला,माझा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. पण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन चालणाऱ्या साहेबांच्या व्यासपीठावर जे बोलले अन जस बोलले ते आमचे संस्कार नाहीत.अस म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या सभेत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं.

बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार यांच्या सभेत धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले.बीड जिल्ह्यात जो काही विकास झाला तो फक्त आणि फक्त अट दादांमुळे झाला.संपूर्ण बीड जिल्हा साहेबांच्या पाठीशी कायम राहिला पण विकास काही झालं नाही अस म्हणत विकास करण्याचं काम अजित पवार यांनी केले अस त्यांनी सांगितले.

राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्व गोपीनाथ मुंडे महामंडळ उभारण्याच काम अजित पवार यांनी केले.17 तारखेच्या सभेत अजित पवारांवर टीका केली गेली.ज्यांनी टीका केली त्यांचे संस्कार दिसून आले.

बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न बाकी आहेत,जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी तिजोरी थोडी उघडी करा.मी कोणावरही टीका करणार नाही पण माझा इतिहास काढणार्यांना मी सांगू इच्छितो की,2010 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत मला अजित पवार यांनी मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत पोहचू शकलो.

यावेळी धनंजय मुंडे यांनी शेरो शायरी करत उपस्थितांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *