News & View

ताज्या घडामोडी

स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

बीड- शहरातील सर्कस ग्राउंड भागात राहणारे विकास डावकर यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला.स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही,मात्र यामध्ये डावकर यांच्या मुलाची बेडरूम जळून खाक झाली.

बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा.शिक्षण घेणाऱ्या प्रसादच्या बेडरूममध्ये रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला.

हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की त्यामध्ये बेडरूम पूर्णपणे जळून खाक झाली.या ठिकाणी असलेला प्रसाद हा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला.स्फोट एवढा भीषण होता की घराला तडे गेले आहेत.नेमका स्फोट कशाचा झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *