News & View

ताज्या घडामोडी

तुम्ही माझं काय बघितलं- पवारांनी डागली अमरसिंह पंडितांवर तोफ!

बीड- बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत शरद पवार हे ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्यावर बरसतील अस वाटत होतं पण पवारांनी टार्गेट केलं माजी आ अमरसिंह पंडित यांना.’तुम्ही माझं वय काढता,पण तुम्ही माझं अस काय काय बघितलं’अस म्हणत शेलक्या शब्दात पवारांनी पंडित यांच्यावर निशाणा साधला.पवारांच्या या हल्याने पंडितामध्ये खळबळ उडाली असणार यात शंका नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवला येथे पहिली सभा घेतली.तेथे 2019 ला उमेदवार देण्यात चुकलो अस म्हणत त्यांनी माफी मागितली होती.त्यानंतर पवार यांनी दुसरी सभा घेतली ती धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात. त्यामुळे ते येथील सभेत त्यांना टार्गेट करतील अस वाटलं होतं.

पंरतु पवार यांनी या सभेत माजी आ अमरसिंह पंडित यांच्यावर टीकेची झोड उठवली. तुम्ही माझं वय काढता,मात्र तुम्ही माझं अस काय काय पाहिलं अस म्हणत ज्यांनी तुम्हाला भरभरून दिलं त्यांच्याबद्दल इतका वाईट विचार करू नका,जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अस म्हणत पवारांनी थेट अमरसिंह पंडित यांना इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *