बीड जिल्ह्याने कायमच अडचणीच्या काळात मला साथ दिलेली आहे ज्यावेळी मी एस काँग्रेस स्थापन केली त्यावेळी देखील बीड जिल्हा माझ्या पाठीशी होता आजही जिल्हा माझ्या पाठीशी आहे असा दावा करत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील ओबीसी नेते आहेत . ते आपल्या सोबत आहेत सभेची जोरदार तयारी सुरू असून सभा यशस्वी होईल याबद्दल आपल्या मनात शंका नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांचे भर पत्रकार परिषदेत तोंड भरून कौतुक केले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर असून छत्रपती संभाजी नगर येथे दोन दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्य आणि देश पातळीवरील प्रश्नांचे उत्तरे दिल्यानंतर पवारांनी बीडमध्ये सभा घेण्याचे कारण सांगितले छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात सभा घेऊन आपण ओबीसी नेत्यांना लक्ष करत आहात का या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे देखील ओबीसी आहेत आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत जिल्ह्यातील जनता आपल्या सोबत आहेत असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी सभेची जोरदार तयारी केली आहे असं कौतुकही पवार यांनी केलं
एस काँग्रेसची स्थापना आपण जेव्हा केली तेव्हा बीड जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आपल्या पाठीशी उभे केले त्यावेळी सुंदरराव सोळुंके शिवाजीराव पंडित यांच्यासारख्यांचा पराभव लोकांनी केला त्यामुळे आपल्याला चिंता नाही मला अडचणीच्या काळात नेहमीच बीड जिल्ह्याने खंबीरपणे साथ दिली आहे आणि आता संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून हा जिल्हा पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण बीडला सभा घेत आहोत असंही शरद पवार यांनी सांगितलं शेजारी बसलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे देखील बीड जिल्ह्यातील असल्याची आठवण पवारांनी यावेळी पत्रकारांना करून दिली
Leave a Reply