News & View

ताज्या घडामोडी

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडला ध्वजारोहण !

बीड- राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि पालकमंत्री कधी जाहीर होणार हे निश्चित झालेलं नाही,मात्र सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण कोण करणार याची यादी जाहीर केली आहे.बीडचे पालकमंत्री असलेले अतुल सावे हे परभणी येथे तर कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बीडला ध्वजारोहण करतील.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन कऱणार आहेत.

झेंडावंदन करणाऱ्या नेत्यांची यादी पुढील प्रमाणे

देवेंद्र फडणवीस – नागपूर,अजित पवार – कोल्हापूर,छगन भुजबळ – अमरावती,सुनील मुनगंटीवार – चंद्रपूरचंद्रकांत पाटील – पुणे,दिलीप वळसे पाटील – वाशिम,राधाकृष्ण विखे पाटील – नगर,गिरीश महाजन – नाशिक,दादा भूसे – धुळे,गुलाबराव पाटील – जळगाव,रवींद्र चव्हाण – ठाणे,हसन मुश्रीफ – सोलापूर,दीपक केसरकर – सिंधूदूर्ग,उदय सामंत – रत्नागिरी,अतूल सावे – परभणी,संदीपान भुमरे, – औरंगाबाद,सुरेश खाडे – सांगली,विजयकुमार गावित – नंदूरबार,तानाजी सावंत – उस्मानाबाद,शंभूराजे देसाई – सातारा,अब्दुल सत्तार – जालना,संजय राठोड – यवतमाळ,धनंजय मुंडे – बीड,धर्मराव अत्राम – गडचिरोली,मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर,संजय बनसोडे – लातूर,अनिल पाटील – बुलडाणा,अदिती तटकरे – पालघर,रायगड – जिल्हाधिकारी,हिंगोली – जिल्हाधिकारी,वर्धा – जिल्हाधिकारी,गोंदिया – जिल्हाधिकारी,भंडारा – जिल्हाधिकारी,अकोला – जिल्हाधिकारी,नांदेड -जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *