News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशिभविष्य !

मेष – ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गृहसौख्य चांगले राहील. मुलांशी वाद घालू नका.

वृषभ – मनात आनंदी विचार राहतील. नकारात्मक विचार निघून जातील. अडचणी दूर होतील… हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सहज यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल.

मिथुन – दूरच्या प्रवासाचे योग येतील. महत्त्वाच्या कामात विलंब होऊ शकतो. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. व्यवसायात बन्यापैकी प्राप्ती होईल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. लोकांच्या भेटीगाठी होतील.

कर्क – तुमच्या अवतीभोवती अनुकूल वातावरण राहील. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्र- मैत्रिणींच्या भेटी होतील. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील.

सिंह – नोकरीत नवीन संधी चालून येईल. त्यातून तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मात्र, कामाचा ताण राहील. मुलांना योग्य मार्ग मिळतील. जीवनसाथीशी कठोर संभाषण टाळा. घरी पाहुणे मंडळी येतील. भविष्यातील चांगल्या संधीची चाहूल लागेल.

कन्या – भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. अडचणी दूर झाल्यामुळे मनावरील ताण कमी होईल. मनात आनंदी विचार राहतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

तूळ – मनात आत्मविश्वास राहील. अनेकांचे तुम्हाला सहकार्य मिळेल. मात्र, एखाद्या महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. फार दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होऊ शकतो.

वश्चिक – तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची खंबीर साथ तुम्हाला मिळेल. कामाचा ताण राहील; पण गोड बोलून लोकांची मने जिंकून घेतली, तर कामे सुकर होतील. मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल.

धनू – विरोधकांच्या कारवीया हाणून पाडाल. लोक त्यांची चूक कबूल करतील. आता त्यांच्याशी प्रेमाने वागा, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली राहील. नवीन कल्पना विकसित केल्या जातील. नोकरीत सहकारी वर्गाशी कठोर संभाषण टाळा.

मकर – नोकरीत अनुकूल घटना घडतील लोकांच्या सहकार्याच्या जोरावर सफलता मिळेल. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

कुंभ – नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. नवीन काम आपण यशस्वी करून दाखवाल. मात्र, भावनेच्या भरात कुणाचा अपमान करू नका. घरी पाहुणे मंडळी येतील. एखाद्या उलाढालीत मोठा लाभ होऊ शकतो.

मीन – व्यवसायानिमित्त बरीच मेहनत करावी लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. जाणकार मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. मुलांना योग्य संधी मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *