बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पहिली सभा येवला येथे झाल्यानंतर पवारांची दुसरी सभा बीडला होणार आहे.या सभेचे नियोजन आणि जबाबदारी आ संदिप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 जुलै रोजी फूट पडल्यानंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.त्यांनी पहिला दौरा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात म्हणजेच येवला येथे केला होता.त्यानंतर जवळपास मागील महिनाभर पवार शांत होते.
दरम्यान शनिवारी मुंबई येथील वाय बी सेंटर येथे आगामी दौऱ्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. यामध्ये 17 ऑगस्ट रोजी बीड आणि धाराशिव येथे जाहीर सभा होणार आहे.या सभेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी संपूर्ण जबाबदारी आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदिप क्षीरसागर यांच्यावर देण्यात आली आहे.
Leave a Reply