News & View

ताज्या घडामोडी

महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !

बीड- महसूल सप्ताहानिमित्त बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल 155 प्रकरणे निकाली काढली.महसूल प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविल्याने सर्वसामान्य लोकांमधून त्याचे कौतुक होत आहे.

सामाजातील प्रत्येक घटकांच्या नागरिकांसाठी दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात तर तहसीलदार डोके यांच्या नेतृत्वात बीड तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम घेण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने बीड महसूल मंडळात मंडळाधिकारी सचिन सानप यांच्या नेतृत्वात काल दि.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद साधला तर एक हात मदती अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना चेकचे वाटप करण्यात आले. कुटुंब अर्थसहाय योजना, संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले, ऑनलाईन फेरफार निकाली काढण्यात आली. फेरफार अदालत घेवून या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. शिवाय 155 चे प्रकरणे तलाठ्यांच्या लॉगिनवर ऑनलाईन करण्याचे निर्देश तलाठ्यांना देण्यात आले. एकंदरीत बीड महसूल मंडळात महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात राबवून नागरिकांच्या अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यावेळी मंडळातील सर्व तलाठी, कोतवाल अरविंद राऊत, सिधू बागलाने, गणेश शेळके, महेश भवर आदींसह लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *