धुळे- शेतकऱ्यांना बोगस खत बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी बाबत थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही शेतकऱ्यांनी फोनवर तक्रार केली.याची तातडीने दखल घेत मुंडे यांनी थेट कंपनीचा परवाना निलंबित केला आहे.
धुळे जिल्ह्यमधील ग्रीनफिल्ड एग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या खत तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांसाठी बोगस बि-बियाणांसाठी एक नंबर दिला आहे. ज्यावर आपण कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो.
धनंजय मुंडे यांचं ट्विट:-
बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. या कारवाईमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे.
Leave a Reply