News & View

ताज्या घडामोडी

IMG 20230725 WA0023

मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !

बीड- बीड महसूल मंडळाचे मांसल अधिकारी सचिन सानप हे सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देऊन कामात अडेलतट्टू पणा करत आहेत.त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

बीडचे मंडळ अधिकारी सचिन सानप हे कोणताही फेर मंजुरी साठी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्रास देतात.वकील असो की आशील या दोघांना वारंवार घेटे घालायला लावून तोडीपाणी ची भाषा करतात.प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची भेटसुद्धा होत नाही.

बीड महसूल मंडळातील अनेक प्रकरणे त्यामुळे प्रलंबित असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.याबाबत ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून सानप यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सचिन सानप यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेसोबतच कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.अत्यंत उद्धट वागणूक,मनमानी कारभार करणाऱ्या सानप यांच्यावर प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *