News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcity

  • वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड…

  • दिव्यांग शिक्षकांची जे जे मध्ये होणार तपासणी !

    बीड- जिल्हा परिषदेच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या तब्बल 41 शिक्षकांना 31मे पर्यंत मुंबईच्या जे जे रुग्णालयात हजर राहून तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.शिक्षकांनी हा अहवाल वेळेत न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलाच्या वेळी तब्बल 300 पेक्षा जास्त शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र…

  • देवस्थान जमीन घोटाळ्यात फडणवीस यांच्याकडून आ धस यांची पाठराखण !

    बीड- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी आ सुरेश धस यांना वाचवण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रयत्न करत असल्याचा आरोप फिर्यादी राम खाडे यांनी केला आहे.खाडे यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थानच्या जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत करत कोट्यावधींचा घोटाळा केल्याची…

  • आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    बीड- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल 32 लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • बीडमधील महिलेवर गँगरेप !

    माजलगाव- रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कबाड गल्लीत हा भयंकर प्रकार सुरू होता.या महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तिचे शोषण केले. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका…

  • बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बीड- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत…

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…