Tag: #शालेयशिक्षणविभाग
-
प्रति शिक्षक वीस लाखाप्रमाणे शंभर कोटी केले गोळा!
नागपूर -नागपूर जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांच्या नियुक्ती बाबत तपासणी पूर्ण झाली असून त्यातील जवळपास 649शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांकडून प्रत्येकी किमान वीस लाख रुपये याप्रमाणे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रशासन, संस्थाचालक यांनी गोळा केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव व तत्कालीन शिक्षण उपसंचालक…
-
शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून याची देखील चौकशी सुरु झाल्याने संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन…
-
नागनाथ शिंदे, फुलारीनी केला पाचशे कोटींचा घोटाळा!
शिक्षण आयुक्तांचे चौकशीचे आदेश! संस्थाचालकांवर देखील होणार कारवाई! बीड -बीड जिल्ह्यात 2012 ते 2019 आणि गेल्या तीन वर्षात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक आणि कर्मचारी भरती करण्यात आली. न्यूज अँड व्यूज ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. काही संस्थाचालकांनी उपसंचालक कार्यालयापासून ते मंत्रालय पर्यंत फिल्डिंग लावली. मात्र बकरे कि माँ कब तक दुवा मांगेगी या पद्धतीने…
-
वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
बोगस शिक्षक भरतीमध्ये दोनशे कोटींची उलाढाल!! नागपूर -विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली सह इतर जिल्ह्यात हजारो शिक्षकांच्या बोगस भरती प्रकरणी किमान वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट काढण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात आतापर्यंत सात अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली…
-
प्राथमिक, माध्यमिक आणि पे युनिट!पैशाचा महापूर!!
बीड -शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी चा प्रस्ताव असो कि वैयक्तिक मान्यता अथवा पेन्शन या सगळ्या कामासाठी प्राथमिक असो कि माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी लाखो रुपयांची आकरणी केली जाते. विशेष बाब म्हणजे या सगळ्यासोबत पे युनिट नावाच्या विभागात देखील लाखो रुपये घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावला जातं नाही. या सगळ्या गोष्टी बिनबोभाट पणे सुरु असतात…
-
पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!
बीड -सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. बीड जिल्हा…
-
शाळांना तीन दिवस सुट्टी!
मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सोमवार ते बुधवार अशी सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळेतील शिक्षकांना निवडणुकीत ड्युटी लागली आहे त्या शाळा थेट गुरुवारी उघडणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची…
-
संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!
बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…
-
फुलारी बीडचे नवे शिक्षणाधिकारी !
बीड- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नाशिक येथून भगवान फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. तर शिक्षणाधिकारी योजना या पदावर संजय पंचगल्ले यांची नियुक्ती झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती नंतर माध्यमिक विभागाचे नागनाथ शिंदे यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने…
-
शिक्षणाधिकारी शिंदेंनीच शिक्षण हक्क कायदा बसवला धाब्यावर !
शाळेवरील शिक्षकांना ठेवले दिमतीला ! बीड- शिक्षणाचा हक्क कायदा नुसार शिक्षकांना राष्ट्रीय कार्य आणि शिक्षण याशिवाय दुसरी कामे देऊ नयेत असे आदेश आहेत.मात्र बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनीच हे कायदे आणि नियम धाब्यावर बसवले आहेत.एक दोन नव्हे तर चार चार शिक्षक स्वतःच्या दिमतीला ठेवून घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.सीईओ पाठक याकडे लक्ष देत…