News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    नाली साफ करताना जेसीबीच्या खोऱ्यात बाहेर आला मृतदेह !

    बीड- शहरातील सुभाष रोड,माळीवेस भागात नाल्यांची साफसफाई सुरू असताना जेसीबीच्या खोऱ्यात चक्क मानवी मृतदेह आल्याने खळबळ उडाली.पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम सध्या सुरू आहे.बीड शहरातील सुभाष रोडवर असलेल्या नेहरू नगर च्या मोठ्या नाल्याची जेसीबी मार्फत साफसफाई सुरू होती. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या खोऱ्यात…

  • महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !

    महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !

    बीड- अपहार प्रकरणात निलंबित असताना कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या रमेश नखाते या शिक्षकास सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे. 26 लाखाचा भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा, शिंदेवाडी केंद्र नित्रुड येथे करत असलेल्या रमेश विष्णुपंत नखाते या पदवीधर शिक्षकाने एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी…

  • शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    शिंदे असो की बोराडे,प्रत्येकाचेच सॉफ्टटेक वर विशेष प्रेम !

    बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड कार्यालयात शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी बोगस बिल सादर करून करोडो रुपये छापले. याचा एक नमुना म्हणजे बांधकाम विभागात अद्ययावत कॉम्प्युटर सिस्टीम आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असताना सॉफ्टटेक कॉम्प्युटर आणि सॉफ्टटेक पॉवर या फर्मवर दिवसाला किमान दोन लाख रुपये उधळण्यात आले आहेत.या नावावर दरवर्षी करोडो रुपये उचलून हे…

  • गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

    गेवराई नजीक भूकंप, बीड जिल्ह्यात हादरे ?

    बीड- बीड जिल्ह्यातील काही भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.भूगर्भातील हालचालीमुळे हा प्रकार झाला असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे मात्र व्हॉल्कानो डिस्कव्हरी या वेबसाईट ने हा भूकंप असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.गेवराई मध्ये हा भूकम्पाचा केंद्रबिंदू असल्याचा दावा या वेबसाईट ने केला आहे.या भूकम्पाचे हादरे नगर जिल्ह्यातील पाथर्डी,आरणगाव आणि नगर मध्ये…

  • बीड हादरले ! भूकंप की गूढ आवाज ?

    बीड हादरले ! भूकंप की गूढ आवाज ?

    बीड- बीड शहरासह तालुक्यातील अनेक भागात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी मोठा आवाज झाला.हा आवाज भूकम्पाचा होता की जमिनीतून गूढ आवाज आला याची माहिती प्रशासन घेत आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरासह आसपासच्या परिसरात गूढ आवाज आला.हा आवाज मोठा होता.काही क्षण जमिनीतून आलेल्या आवाजाने चांगलाच हादरा बसला.बहुतांश ठिकाणी घराच्या खिडक्या,पत्रे हादरले.नेमका आवाज कशाचा झाला…

  • खरेदी विक्री संघ बिनविरोध !

    खरेदी विक्री संघ बिनविरोध !

    बीड – बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी बिनविरोध झाली असून यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे ९ तर महायुतीचे ६ असे एकूण १५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे. बीड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ म. बीड संचालक मंडळाची पंचवार्षिक…

  • विशाल साडी सेंटर फोडले !

    विशाल साडी सेंटर फोडले !

    बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार…

  • बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !

    बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !

    परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…

  • मुंबईतील आंदोलन उद्यापर्यंत सुरूच राहणार – जरांगे पाटील !

    मुंबईतील आंदोलन उद्यापर्यंत सुरूच राहणार – जरांगे पाटील !

    मुंबई- राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत,त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे.यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल.नोंदि सापडण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.असे सांगत शनिवारी आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 54 लाख पैकी 37 लाख लोकांना…