Category: बीड
-
मनोज जरांगे यांची सभा रद्द !
बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे 8 जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली आहे, लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली. नारायणगड येथे 8 जून रोजी महासभा आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात…
-
पाच लाखाची लाच स्वीकारली !पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा !
बीड- शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमध्ये एका खाजगी इसमास अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खाडे याच्या बीड येथील घराची झडती घेतली असतां कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती…
-
कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !
बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील…
-
बीड जिल्ह्यात 71 टक्के मतदान !
बीड- बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असतानाही परळी गेवराई आष्टी बीड या तालुक्यात अनेक भागांमध्ये रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते जिल्हा वास यांनी यंदा कधी नव्हे ते भरभरून मतदान करत तब्बल 71 टक्के चा टप्पा गाठला सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यात…
-
सहा वाजेपर्यंत 68 टक्के मतदान !
बीड- बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श…
-
पवारांची उद्या बीडला सभा !
बीड – इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारी म्हणजेच…
-
प्रवक्त्याने ढापले तेरा लाख !
बीड- लोकसभा निवडणूक जाहीर होण्या अगोदर विद्यमान खासदाराकडून एका प्रवक्त्याने तब्बल तेरा लाख रुपये ढापले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे हे पैसे पत्रकारांना देण्यासाठी घेतले गेले होते,पण त्यात स्वतःचे उखळ प्रवक्ता महाशयांनी पांढरे केल्याची चर्चा आहे. देशभरात दीड महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली.भाजप 400 पार जाणार की नाहि यावर चर्चा सुरू झाल्या.देशात मोदी…
-
मुंडेंच्या कन्येला दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी !
अंबाजोगाई- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे आणि माझे स्नेहपूर्ण सबंध होते,त्यांच्या अकाली निधनामुळे माझे व्यक्तिगत मोठे नुकसान झाले. येणाऱ्या 13 मे रोजी मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर…
-
पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांना नोटीस !
बीड- लोकसभा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील वेळेत न देणाऱ्या अन खर्चाच्या तपशिलात तफावत आढळून आल्याने भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम तपासणी न करणाऱ्या उमेदवारांमध्ये करुणा धनंजय मुंडे, शेषेराव चोकोबा वीर, गोकुळ बापूराव सवासे, प्रकाश भगवान सोळंके, राजेंद्र अच्युतराव होके, शेख तौसिफ…
-
पवारांची आष्टी येथील सभा रद्द !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी आष्टी येथे आयोजित करण्यात आलेली प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. पवार यांची तब्येत बिघडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बीड लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, साहेब, तब्येतीला…