Category: बीड
-

उमाकिरण शैक्षणिक संकुल सील!तगडा पोलीस बंदोबस्त तैनात!
बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैर कृत्याच्या नंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात…
-

खाजगी कोचिंगच्या दोघांवर पोस्को दाखल!
बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. बीड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात…
-

पाणी पुरवठ्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता जाळ्यात!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या कारवाईमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेले लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये मोठ्या…
-

भुयारी गटार, डिव्हायडर, अटल अमृत बाबत आ क्षीरसागर आग्रही!
बीड – बीड शहरातील अनेक महत्त्वाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (दि.२३) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकार यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत बीड शहरातील भुयारी गटार योजना, नगर रोडवर जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी दुभाजक खुला करणे, नवीन अटल अमृत योजनेचे नळ कनेक्शन तसेच शहरात सुरू असलेली स्वच्छता मोहीम या महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा…
-

जितीन रहमान यांनी पदभार स्वीकारला!
बीड -जिल्हा परिषदेचे नूतन सिइओ जितीन रहमान यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी त्यांचे स्वागत केले. बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची मागील आठवड्यात बदली झाली. त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुंगनाथम यांनी येण्यासाठी नकार दिला. त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेचे सिइओ जितीन रहमान यांची नियुक्ती करण्यात आली. रहमान यांनी…
-

छत्रपती च्या ठेवीदाराची शाखेसमोर आत्महत्या!
बीड -गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट च्या शाखेसमोर सुरेश जाधव या ठेवीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चेअरमन संतोष भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भंडारी यांनी अनेक दिवसापासून ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी म्हटले आहे की, मी व माझे पती सुरेश…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ कृष्ण सप्तमी🌸 नक्षत्र… पुर्व भाद्रपदा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १८ जुन २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-

बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी पथक दाखल!
बीड -जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या बोगस शिक्षक भरतीची चौकशी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाचे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने दिवसभर शिक्षण विभागाची चौकशी केल्याने नेमकं काय काय बाहेर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2022 ते 2025 या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती झाल्याच्या…
-

बीडला जितीन रहमान नवे सिइओ!
बीड -जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले एम मुरुग्णथम हे रुजू न झाल्याने आता जितीन रहमान यांची या जागेवर नियुक्ती झाली आहे. जितीन रहमान हे वर्धा येथे सिइओ म्हणून गेल्या वर्षभरापासून रुजू आहेत. जिवने यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. आता ते तरी बीडला रुजू होणार का असा प्रश्न…
-

जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यात!
बीड -उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कारेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधत जॉन्सन चांगलेच रमले. यावेळी जिल्हा परिषदेचे सिइओ यांच्यासह अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगव्हाण येथे प्रवेशोत्सव 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक…



