Category: बीड
-
बनावट नोटाप्रकरणी बीडमध्ये छापे!
बीड -बीड शहरात काही दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी शहरातील विविध चौदा ठिकाणी छापे घातले. यामध्ये एका आरोपीस अटक केली आहे, सनी आठवले सह दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वी पाचशेच्या बनावट नोटा चलनात वापरल्या प्रकरणी दोघा जणांना…
-
‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश!
नवी दिल्ली -बीडच्या ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. ‘ज्ञानधारा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत….
-
ज्ञानराधाच्या ठेवीदारावर गोळीबार!
बीड – तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी देशात गाजत असलेल्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी बाबत खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे कुटे यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या ठेवीदारावर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील काही खातेधारकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट…
-
संघाच्या संस्थेला लागली भ्रष्टाचाराची वाळवी!पाळे मुळे कोण खणून काढणार!
बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत…
-
बीडला बुधवारी सुट्टी!
बीड -बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी असलेली ईद-ए-मिलाद ची सुट्टी प्रशासनाने रद्द केली असून त्या ऐवजी ही सुट्टी 18 सप्टेंबर बुधवार रोजी देण्यात आली आहे.राज्य सरकारने मुंबई आणि उपनगर मधील ईद ची सुट्टी बुधवारी दिली तसेच इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार बीडला बुधवारी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. राज्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद…
-
सॅम्पल सर्व्हे तातडीने करा, पंधरा दिवसात अग्रीम विमा द्या -कृषिमंत्री मुंडेंच्या कडक सूचना!
बीड-मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या 8 दिवसात पूर्ण करुन त्यापुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पिक विमा मिळावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आज बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री मुंडे…
-
परळीतील साडेपाचशे कुटुंबाना डीएम चा मदतीचा हात!
परळी – परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय…
-
जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्या नाल्याना पूर!
बीड -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. जिल्ह्यातील 61महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तब्बल शंभर मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस 35महसूल मंडळात झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद…
-
टाटा, एचडीएफसी, आयसीआयसीआय मध्ये नोकरीची संधी!वैष्णो पॅलेस ला या अन जागेवर नोकरी मिळवा -अनिल जगताप!
बीड -टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय, एक्सीस, गोदरेज या सारख्या देशातील टॉप च्या कंपन्या मध्ये नोकरी करण्याची संधी रविवारी बीडच्या माँ वैष्णो पॅलेस मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी भरती महोत्सव मध्ये मिळणार आहे. या संधीचा लाभ बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. या महोत्सव चे उदघाटन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या…
-
अडीच महिन्यापासून फरार यशवंत कुलकर्णी जेरबंद!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी प्रकरणात अडीच महिन्यापासून फरार असलेल्या यशवंत कुलकर्णी याला पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. त्याच्यासह त्याचा मुलगा देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ज्ञानराधा (dnyanradha multistete )मल्टीस्टेट प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्वच संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्ब्ल चालीस ते पन्नास गुन्हे आतापर्यंत…