Category: बीड
-

मुरूगनाथम एम बीडचे नवे सिइओ!
बीड -अवघ्या आठ महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत रुजू झालेले सिइओ आदित्य जिवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदिया येथून मुरुंगनाथम एम हे येणार आहेत. राज्य शासनाने काही भाप्रसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे सिइओ आदित्य जिवने यांचा समावेश आहे. जिवने यांना सहायक संचालक महावितरण येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्हा परिषदेचे…
-

शिक्षण प्रसाराच्या नावाखाली मांडला धंदा! आर्थिक उलाढालिमुळे संस्थाचालक चौकशीच्या फेऱ्यात!
बीड -भारतीय नावाने शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करायच अन त्याच शिक्षण मंडळात भारतीय आणि विशेषतः संघाशी संबंधित असणाऱ्यांची पिळवणूक करायची असा धंदा काहींनी मांडला आहे. साधा शिक्षक असलेला माणूस अधिकार प्राप्त झाल्यावर कशा पद्धतीने आपल्याच सहकाऱ्यांची पिळवणूक करतो याचे उदाहरण या प्रसारक मंडळात दिसून येते. या सगळ्या बाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही फरक पडत नाही…
-

राजवीर कोकाट चे जेईई मध्ये यश!
बीड -प्रतिनिधी मुलाच्या शिक्षणासाठी गाव सोडून बीड गाठले…बीडमध्ये चालक म्हणून काम करत मुलाचे शिक्षण सुरु ठेवले.. आपल्या शिक्षणासाठी आईवडील घेत असलेल्या कष्टाची जाण मुलाने ठेवली अन् जेईई ॲडव्हान्स परिक्षेत यश मिळवले… राजवीर भारत कोकाट असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा आता आयआयटी प्रवेश निश्चित झालाय.. बीड येथील जोशीज मॅथस् क्लासेसमध्ये गेले दोन वर्ष धडे गिरवणाऱ्या राजवीर…
-

गाईंची तस्करी, पेठबीड मध्ये गुन्हा दाखल!
बीड – पेठबीड भागात कत्तलीसाठी गाईंची तस्करी केली जातं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहमदिया कॉलनी भागात छापा घातला. यावेळी 17 गाई मिळून आल्या. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहमदिया कॉलनी भागात पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गाई बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले, पोकॉ…
-

दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची होणार पडताळणी!
बीड -राज्यातील बहुतांश खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमध्ये तसेच कार्यालयात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळेवलेल्या तसेच बढती घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर पालिका तसेच खाजगी शाळांमध्ये मोठ्या…
-

नगररोड क्रॉसिंग साठी आ क्षीरसागर आग्रही!
बीड – बीड शहरातून जाणाऱ्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या नगर रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका या दरम्यान एकही क्रॉसिंग नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रॉंग साईडने गाड्या येतं असल्याने अपघाताची भीती आहे, या प्रश्नावर बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न तातडीने मार्गी…
-

शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल!
बीड- सव्वा दोन कोटी रूपयांच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम हा आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी…
-

भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !
बीड -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली…
-

वादग्रस्त शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेची बदली!
पाचशे कोटीच्या घोटाळ्यात चौकशी सुरु असलेल्या अन बदली न करण्याचे आदेश असताना बदली झाल्याने आश्चर्य! बीड -खाजगी शिक्षक भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि शिक्षण मंत्रालयाने चौकशी सुरु केलेले आणि टी चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली ण करण्याचे आदेश दिलेले बीडचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची मंत्रालयातूनच अमरावती येथे बदली झाल्याने मंत्रालयातील भोंगळ कारभार उघडकीस आला…
-

अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!
बीड -छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त संस्कार भारती बीड आणि भारतीय जनता पक्ष बीड च्या वतीने अमृत मंगल कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित…


